मुरुड | वार्ताहर |
मुरुडची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवीचे मंदिर नवरात्रौत्सवापासून भाविकांसाठी सुरु करण्यात आले. कोटेश्वरी देवीवर मुरुडच्या भाविकांची अपार श्रद्धा आहे, नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते.देवीला रोज नवीन साडी व आभूषणांनी सजविले जाते तसेच मंदिर ट्रस्ट समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर लॉकडाउन काळात बंद केल्याने भाविकांची घोर निराशा झाली होती आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने शासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे कोरोना सुरक्षिततेबाबत घालून दिलेल्या अटी व नियमांचा अवलंब करून सुरु करण्याबाबत मान्यता दिल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री कोटेश्वरी मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळून दर्शनाचा लाभ घेतला.