| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील तलाठी कार्यालयातील कोतवाल नागसेन कृष्णा दाभणे हे आपली 26 वर्षे सेवा करुन दि. 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. ते 1997 मधे या सेवेत रुजू झाले होते. मुरुड तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागसेन दाभणे यांना नायब तहसीलदार राजश्री साळवी, अव्वल कारकून विजय मापुस्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.
यावेळी तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार राजश्री साळवी, अव्वल कारकून विजय मापुस्कर, रिमा कदम, मंडळ अधिकारी खुशाल राठोड (मुरुड), संजय तवर (नांदगाव), तलाठी अरविंद देशमुख (नांदगाव), रुपेश रेवसकर (मुरुड), रेश्मा विरकुड (खार आंबोली), सपना वाटते (सावली), वरदा मयेकर (विहूर), कोतवाल व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.







