जे.एस.एम. महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण अभियान

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आरोग्य खात्याच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ दिनांक 25 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कोविड-19 चे लसीकरण करण्यात येणार आहे.
‘मिशन युवा स्वास्थ्य’ कार्यक्रमाच्या अंतर्गत अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयातही हे अभियान राबविण्यात येत आहे. दि. 25 ऑक्टोबर2021 रोजी सकाळी दहा वाजता मा.श्री.प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग नगर परिषद यांच्या हस्ते या लसीकरण अभियानाचे उद्घाटन होणार आहे. या अभियानात सहभागी होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे व ‘मिशन युवा स्वास्थ्य’ यशस्वी करावे असे आवाहन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. संजय दत्ता पाटील, उपाध्यक्ष मा.ड.श्री.गौतम पाटील, सेक्रेटरी मा.श्री. अजित शाह यांनी केले आहे.
18 वर्षावरील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लस घेतली नाही तसेच या कालावधीत जे विद्यार्थी दुसरा डोस घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले आहे. लसीकरणासाठी येत असताना आपले आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावे. तसेच आपले ओळखपत्र , ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा इतर कोणतेही ओळखपत्र सोबत आणावे. तसेच येताना मास्क घालून यावे, सुरक्षित अंतर ठेवावे असेही आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागात हे अभियान विभागीय सहसंचालक डॉ.संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. ए.व्ही.जाधव (7721813636) व प्रा. पी.डी.दातार (9422494583) यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version