अंतरवन पिंपरीत प्रस्थापितांना दणका; भाकप-शेकापचे क्रांतिसिंह नाना पाटील पॅनल विजयी

। बीड । प्रतिनिधी ।
बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी येथे ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड भाऊ प्रभाळे, शेतकरी कामगार पक्षाचे मुकुंद शिंदे, राहुल शिंदे यांच्यासह गावातील युवकांनी क्रांतिसिंह नाना पाटील पॅनल उभा करत मतदारांना नवा पर्याय दिला. या निवडणुकीत सातपैकी सहा जागांवर क्रांतिसिंह नाना पाटील पॅनलने दणदणीत विजय मिळवला.

या निवडणूकीत लाल बावट्याने अनेक वर्षांपासून सत्तेत असणार्‍यांना दणका दिल्याने जिल्हाभर चर्चा सुरु आहे. या सर्व उमेदवारांचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणी आ. जयंत पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते नामदेवराव चव्हाण, कॉम्रेड ज्योतीराम हुरकुडे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड, अ‍ॅड नारायण गोले पाटील यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version