पालीमध्ये रंगणार कृषीवल हळदीकुंकू सोहळा

सोनी मराठी चॅनेलच्या कलावंतांची उपस्थिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषीवलचे हळदीकुंकू म्हणजे महिलांचा मान, सौभाग्याच दान, कर्तृत्वाचा सन्मान या उक्तीनुसार मालिकेतील दुसरा हळदीकुंकू सोहळा शनिवारी ( 21 जानेवारी) पाली येथे दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी कृषीवल परिवार आणि शेकाप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

कृषीवलतर्फे आता रायगडात ठिकठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ हळदीकुंकू सोहळे आयोजित केले जात आहेत. बुधवारी (18 जानेवारी) अलिबाग येथे हळदीकुंकूचा पहिला सोहळा दिमाखात पार पडला. त्यानंतर आता पालीमध्ये दुसरा सोहळा आयोजित केला आहे. अष्टविनायकाचे एक क्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र बल्लाळेश्‍वराच्या भूमीत शनिवारी -पाली येथील मराठा समाज हॉल येथे 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 दरम्यान वाजता हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलावंत प्रत्यक्ष पालीतील महिलांच्या भेटीला येऊन त्यांचा आनंद द्गिगुणीत करणार आहेत. हळदीकुंकू सोहळ्यात महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी प्राप्त करुन दिली आहे.

या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध जीवाची होतिया काहिली फेम प्रतिक्षा शिवणकर आणि राज हंचनाळे, श्रुतकिर्ती सावंत त्याचप्रमाणे प्रतिशोध झुंज अस्तित्वाचा फेम पायल मेमाणे व अक्षय वाघमारे आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे. विक्रमावर विक्रम करणा हा सोहळा म्हणजे पाली तालुक्यातील महिलांना सौभाग्याचे लेणे आणि साजश्रृंगार करण्यासाठी एक उत्सवच बनू पहात आहे.

Exit mobile version