| नागोठणे | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा विठोबा खराडे (86) यांचे सोमवार, दि. 27 मे रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. 28 मे रोजी सकाळी म्हसळा येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुले चंद्रशेखर, महेंद्र व महेश, मीना यादव ही विवाहित मुलगी यांच्यासह जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृष्णा खराडे यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.5) श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे, तर उत्तरकार्य शुक्रवारी (दि.7) राहत्या घरी होणार असल्याची माहिती खराडे कुटुंबियांनी दिली.