क्रिती सॅनन झाली अलिबागकर !

मुनवली येथे खरेदी केली कोट्यवधींची जमीन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

दिवसेंदिवस सेलिब्रिटींची अलिबागबद्दल भूरळ वाढत आहे. येथील जमीनी खरेदी करून त्या ठिकाणी अलिशान बंगले बांधण्याला अधिक पसंती दिली जात आहे. क्रिकेटरनंतर सिने सृष्टीतील सेलिब्रेटींकडून मांडवा परिसरात जमीन खरेदीची क्रेझ वाढत आहे. बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सॅननने अलिबाग-मुनवली येथे तब्बल 186 चौरस मीटरचा भुखंड खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे.

जलवाहतूकीमुळे अलिबाग व मुंबई अगदी जवळ येऊ लागली आहे. स्पीड बोटीने अवघ्या पंधरा ते वीस मिनीटात अलिबागला पोहचता येते. त्यात अलिबागमधील समुद्रकिनार्‍यांसह मांडवा परिसरातील निसर्ग अनेकांच्या पसंतीला कायमच उतरला आहे. मांडवा परिसरात जागा खरेदी करून त्याठिकाणी बंगले बांधले जातात. बॉलीवुड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, क्रिकेटर रवि शास्त्रीसह अनेक सेलिब्रिटींनी या परिसरात जमीनी घेतल्या आहेत. त्यात आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री क्रिती सॅननने 186 चौरस मीटर इतकी जागा खरेदी केली आहे. अभिनंदन लोढा यांच्याद्वारे ही जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version