| कर्जत । वार्ताहर ।
कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालयाच्या कृणाल चौधरी या विद्यार्थ्याचा मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील तालवाद्य स्पर्धेत विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरीत तृतीय क्रमांक आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या 55 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवानिमित्त विभाग क्रमांक 07 उत्तर रायगडमध्ये कावसजी जहांगीर दिक्षांत सभागृह, तालवाद्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. कृणाल याने वाद्यवादनाचे शिक्षण गेले आठ वर्ष कर्जत देऊळवाडी येथील गुरुवर्य मंगेश बुवा बेडेकर यांच्याकडे घेतले आहे.
शास्त्रीय पखवाज वादनामध्ये त्याचे मध्यमा प्रथम पर्यंत शिक्षण झालेले आहे. तसेच अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेचे संगीत शिक्षक सौरभ हिवरेकर यांनी देखील त्याला मार्गदर्शन केले. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य आणि सर्व पदाधिकारी, प्रा. डॉ. प्रवीण घोडविंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .






