• Login
Monday, March 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

ओठावरली गाणी…

Varsha Mehata by Varsha Mehata
July 8, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो, अशा आशयाचे एक वचन आहे. त्या धर्तीवर देशातील मिडिया आणि समाजामध्ये काय चर्चा चालू आहे ते सांगा, त्या देशाचे भविष्य सांगतो असे कोणी म्हणू लागला तर ते आपल्यासाठी फारसे आशादायक नसेल. कारण, गेल्या दोन-पाच वर्षांमध्ये आपल्याकडच्या सर्वाधिक चर्चा या हिंदू-मुस्लिम, देवी-देवतांचे वा महापुरुषांचे मानापमान अशांभोवतीच अधिक फिरताना दिसतात. 15 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या मोठी असलेल्या जगातील काही थोड्या देशांमध्ये भारत एक आहे. पंधरा ते वीस कोटी लोकसंख्येच्या मध्यमवर्गाची हुकुमी बाजारपेठ आपल्यापाशी आहे. आयटीसारख्या तंत्रज्ञान वापरू शकणार्‍यांची मोठी फौज आहे. अशा स्थितीत खरे तर तरुणांची स्वप्ने, आशाआकांक्षा, नवनवीन कल्पना, त्यातील अडचणी हे आपल्या समाजातले चर्चेचे, बोलण्याचे विषय असायला हवेत. दुसर्‍या बाजूला, शिक्षणातून गळती होणार्‍यांचं प्रचंड प्रमाण, कमालीची गरिबी आणि वाढती बेकारी हेदेखील या देशाचे वास्तव आहे. ऐंशी कोटी लोकसंख्येला सरकारतर्फे गेले कित्येक महिने जवळपास फुकट धान्यवाटप चालू आहे. देशातील लोकांचा असंतोष त्यामुळेच दबून आहे की काय अशी अनेकांना शंका आहे. कालपरवा घरगुती गॅसच्या किमती आणखी वाढल्या आणि ग्रामीण बेरोजगारीमध्ये जून महिन्यात उच्चांकी वाढ झाल्याचा अहवाल सीएमआयई या संस्थेने दिला. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा विचार करणारे अनेक लोक आहेत. समाजात चर्चा आणि बोलणे यावरही व्हायला हवे. पण हे विषय बाजूला पडतात किंवा पाडले जातात. महत्वाचे ठरतात ते समाजाच्या धार्मिक अभिमानाचे विषय. हे आधी कोणी सुरू केले आणि कोणी कोणाला प्रत्युत्तर दिले याचा विचार करणेही निरर्थक आहे. महंमद पैगंबर यांच्याविषयी भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा वाद इतका धुमसत राहतो की, त्यातून खून पडतात. दुसरीकडे याचा सूड म्हणून की काय अनेक गोष्टी केल्या जातात. चार वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्विटवरून महंमद झुबेर या पत्रकाराला तुरुंगात टाकले जाते. कर्नाटकामध्ये एका नाटकामध्ये मुस्लिम कलाकारांची संख्या जास्त असल्याचे कारण देऊन बजरंग दलातर्फे त्याचा प्रयोग बंद पाडला जातो. आणखी कोणत्या तरी ठिकाणी हिंदू देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्राच्या कागदात मांस गुंडाळून दिल्यामुळे धर्माचा अपमान झाल्याचा गुन्हा दाखल होतो. लोक दिवसचे दिवस याच गोष्टींवर हिरीरीने चर्चा करतात. अनेक सुबुध्द तरुणांना यातच डुंबून राहणे आवडते. पैगंबराच्या अवमाननेबाबत  अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचा खून करण्याचा आरोप असलेले मुस्लिम तरुण हे अतिशय शिक्षित व सुस्थित गटातील आहेत. कर्नाटकातील बजरंग दलाचे कार्यकर्तेही चांगले शिकलेले आहेत. या तरुणांना आपापल्या समाजाच्या अशाच थरांमधून सुप्त पाठिंबाही मिळत असतो. माणसे एरवी चोर्‍या, लांड्यालबाड्या, फसवाफसवी किंवा भ्रष्टाचार करतात. तरीही त्यातून त्यांच्या धर्मांचा किंवा त्या त्या धर्मातील वंदनीय व्यक्तींनी दिलेल्या शिकवणुकीचा अपमान होतो असे त्यांना वाटत नाही. मात्र दुसरा कोणीतरी काहीतरी बोलला म्हणून मात्र लगेच यांचा मानभंग होतो. एरवी माणसे देवाच्या मंडपात दारू पितात, जुगार खेळतात, अचकट-विचकट नाचतात, महिलांचा अनादर करतात. पण यातून धर्माचा अपमान होतो असे कोणालाही वाटत नाही. हीच माणसे नेहमी चवीचवीने जे मांस खातात ते बांधून मिळालेल्या रद्दी पेपरमध्ये देवाचा फोटो होता या कारणावरून त्याचा अपमान झाल्याचे ठरवून टाकतात. एकविसाव्या शतकातल्या प्रगतीशील म्हणवल्या जाणार्‍या देशात हे सर्व घडू दिले जाते. याला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी खरे तर राजकीय पक्षांची आणि सत्तेत असलेल्यांची असते. धर्माचा दुराभिमान ही एक पोकळ गोष्ट असल्याचे या पक्षांनी व विविध सरकारांनी लोकांना सांगायला हवे. पण उलट हेच पक्ष या लोकांना उत्तेजन देतात. आपल्या राजकारणासाठी फक्त सोईने एकाच बाजूने बोलतात. यात आपल्या तरुणांचे केवढे नुकसान होते आहे याची त्यांना पर्वा नाही. या तरुणांच्या ओठावर खेळवली जाणारी ही पोकळ अभिमानाची गाणी नाहीशी होण्यासाठी आम जनतेनेच आता आवाज वाढवायला हवा.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अमरनाथ गुहा ढगफुटी अपडेट: मृतांची संख्या १३ वर, अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली

Next Post

पालनजी मिस्त्री- उत्तुंग व्यक्तिमत्त्व

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post

पालनजी मिस्त्री- उत्तुंग व्यक्तिमत्त्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?