• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

विजेचे त्रांगडे 

Varsha Mehata by Varsha Mehata
August 23, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पैसे थकल्याने महाराष्ट्रासह तेरा राज्यातील वितरण कंपन्यांना एक्स्चेंजवर वीज खरेदी वा विक्री करण्यास मनाई करणारा एक आदेश गेल्या आठवड्यात निघाला होता. महाराष्ट्राच्या वितरण कंपनीचे 381 कोटी रुपये थकले होते. एकोणीस ऑगस्टनंतर पैसे भरल्यास विलंब शुल्क लागू होणार होते. अखेर वीज खरेदीच बंद होणार असल्यामुळे महाराष्ट्रासह बहुतेक राज्यांनी घाईघाईने पैशांची तजवीज केली व ही बंदी मागे घेण्यात आली. तरीही कर्नाटकासारख्या प्रगत राज्याने हे पैसे अजूनही भरलेले नव्हते. विजेच्या धंद्यातील तोटा हा देशातील एक जटील प्रश्‍न झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वीज निर्मिती, वहन आणि वितरण या सर्व सेवा वेगवेगळ्या कंपन्यांकडे सोपवून त्यांचे हिशेब स्वतंत्रपणे ठेवले जाऊ लागले. पण हे म्हणजे पगार तुटपुंजा आहे म्हणून आम्ही ते पैसे थोडे थोडे वेगवेगळ्या पाकिटात ठेवून खर्च करू असे म्हणण्यासारखे होते. अनेक पाकिटात ठेवला म्हणून पगार वाढणार नसतो. तसेच चार कंपन्या केल्या म्हणून विजेच्या धंद्यातील तोटा थांबणारा नव्हता. यातील गाभ्याचा प्रश्‍न हा वीज ही जनतेसाठी पुरवण्याची एक अत्यावश्यक सेवा आहे की नाही हा आहे. या प्रश्‍नाचे उत्तर सोपे नाही. वीज तयार करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. जलविद्युत ते अणुउर्जा यासारख्या विविध प्रकल्पांतील पायाभूत सोई निर्माण करण्यासाठी विविध सरकारांनी आजवर प्रचंड गुंतवणूक केली. मात्र उदारीकरणानंतर सरकारचे करांमधून येणारे उत्पन्न घटले. शिवाय, भांडवल आकर्षित करण्यासाठी खैराती वाढल्या. त्यामुळे मग सरकारला पैसा पुरेनासा झाला. आंतरराष्ट्रीय संस्थांनी कर्जे द्यायला नकार दिला. वीज किंवा पाणी यासारख्या सेवांपोटी जनतेकडून वाढीव दराने पैसे घ्या असा त्यांचा दबाव येऊ लागला. हे दर वाढल्याचा फटका शेतकरी व सामान्य ग्राहकांना बसला. दुसरीकडे अनेक बडे उद्योग मात्र बँकांच्या कर्जांप्रमाणेच विजेच्या थकबाकीतूनही निसटून जाऊ लागले. यातून लोकांचा असंतोष वाढला. मग राजकीय पक्षांनी दुसर्‍या टोकाला जाऊन शेतकरी किंवा गरिबांना फुकट विजेची आश्‍वासने द्यायला सुरुवात केली. दिल्लीसारख्या शहरी भागातही आम आदमी पक्षाने अमुक युनिट वापरापर्यंत वीज फुकट अशा योजना आणल्या. समजा गरिबांना सरकारी सेवा म्हणून वीज फुकट देण्याचा कार्यक्रम मान्य केला तरी विकतच्या विजेच्या बिलांची शंभर टक्के वसुली होईल याची काळजी घेतली जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात कोणत्याच राजकीय पक्षाने तेही केले नाही. त्यामुळे सर्व राज्यांच्या वीज कंपन्या तोट्यात गेल्या. मधल्या काळात तंत्रज्ञानाच्या भरारीमुळे आपल्या देशातील विजेचे जाळे एकमेकांना जोडले गेले. त्यांच्या जोडीने, स्टॉक एक्स्चेंजच्या धर्तीवर एनर्जी एक्स्चेंजेस अस्तित्वात आली. त्यामुळे हॉटेलमधून पिज्झा मागवल्यावर जसा अर्ध्या तासात हजर होतो तशीच विजेची मागणी नोंदवल्यावर ती तात्काळ मिळू लागली. देशाच्या कोणत्याही भागातून इतर कोणत्याही भागात हे वितरण व विक्री होऊ लागली. युरोपातील देशांच्या तोडीचे हे विजेचे जाळे व एक्स्चेंजेस आपण विकसित केली. पण मुळात आपल्या गरीब ग्राहकांचे काय करायचे हा प्रश्‍न कायम होता. त्यांना नेमकी किती सबसिडी द्यावी आणि तो तोटा कोणी व कसा भरून काढावा याचे गणित आपल्याला बसवता आलेले नाही. त्यातच उदारीकरणाच्या नावाखाली काही पक्षांनी अदानी, अंबानी अशासारख्यांच्या कंपन्यांवर कृपा केली व त्यांना शहरी भागातील फायदेशीर व्यवसाय मिळवून दिला. ग्रामीण भागात दूरवर खेड्यापाड्यात विजेचे जाळे उभारण्याचे खर्चिक काम सरकारच्या गळ्यात कायम राहिले. मोदी सरकारने वीज कंपन्यांसाठी उदय योजना आणली. योजनेचे नाव बदलले तरी सरकारचे धोरण तेच राहिले. त्यामुळे तोटा वाढत गेला. आज तो भरून काढायचा तर सर्व राज्य सरकारांना मिळून सुमारे साडेचार लाख कोटी रुपये आपापल्या वीज कंपन्यांमध्ये ओतावे लागतील. शिवाय, तेवढे करूनही या कंपन्या एखादा वर्षच सुस्थितीत राहू शकतील. सारांश, सर्व राजकीय पक्षांनी अत्यंत तातडीने एक राष्ट्रीय समस्या म्हणून या प्रश्‍नाकडे पाहण्याची गरज आहे. कुरघोडीचे राजकारण चालूच राहिले तर देशात एक दिवस अंधार पसरेल.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

Next Post

 निर्यातसंधी साधण्यासाठी…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

 निर्यातसंधी साधण्यासाठी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?