। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील सेंट मेरी स्कूलमध्ये ज्युनियर केजीचा विद्यार्थी शौर्य मंदार जुईकर(वय साडेचार) याचा शाळेतच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. शौर्य याला ताप येत होता. तरीही त्याने पेपर दिला होता. तो दिल्यानंतर डोके धरुनच तो वर्गात बसला होता. शिक्षकानी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला पण तो निपचित पडल्याचे पाहुन त्याला डॉ. चांदोरकर यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शौर्यचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.