• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

सरकारी लूटमार

Varsha Mehata by Varsha Mehata
September 3, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
निर्बंध शिथील, परंतु…
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून आता तो अजून 25 रुपयांनी महागला आहे. गॅसच्या सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढच होत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अत्यंत मूलभूत आणि सर्वसामान्य व गोरगरिबांना आवश्यक असलेले हे साधन इतके महाग करून ठेवलेले आहे की ते अनेकांना परवडणे कठीण झाले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत अनेकांनी पुन्हा लाकडी चुलीकडे पर्याय नसल्याने वळल्याचे चित्र दिसले आहे. त्याच्या बातम्याही माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकार हे लोकांच्या जीवनाप्रती अत्यंत संवेदनशून्य आहे. म्हणूनच या सर्व रोज लागणार्‍या आणि जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट परिणाम करणार्‍या इंधनाचे दर सातत्याने वाढवत ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल मध्ये झालेल्या भरमसाठ वाढीचे परिणाम महागाई वाढण्यात झाले आणि लोकांचे जगणे हे अधिक कठीण बनले. या काळात नोकरी-व्यवसाय गमावून बसलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि प्रत्येक वस्तू वाहतुकीवर अवलंबून असल्याने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचा अतिरिक्त भार जनतेवर पडला. त्याबाबत केंद्र सरकार कोणताही दिलासा देण्याच्या मन:स्थितीत नाही. उलट ते भरमसाठ दर वाढवून जी सरकारी लूट चाललेली आहे त्याचा हिशोबही देत नाही. त्याबद्दलच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत त्यांनी या परिस्थितीवर टीका करतानाच त्याचे विश्‍लेषण केले, सरकारला जबाबदार धरले आणि काही बाबतीत त्यावर मार्गही सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी उपस्थित केलेला प्रश्‍न असा की काँग्रेसचे सरकार गेले तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात 116 टक्के वाढ झाली आहे. तर डिझलचे दर 55 टक्के इतके वाढले आहेत. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव तेव्हा 105 डॉलरला होते, आता 71 डॉलरवर आलेले आहेत. गॅसच्या किमतीही घटलेल्या आहेत. पण नागरिकांना मात्र 116 टक्के वाढीव दराने गॅस घ्यावा लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत सरकारने जो वाढीव दर लावून पैसा मिळवला, त्याचा हिशोब तेवीस लाख कोटी रुपये इतका होतो. हा जनतेच्या खिशातून गेलेला पैसा आहे, त्यामुळे त्याचा हिशोब सरकारने दिला पाहिजे. म्हणून त्यांनी ते पैसे कुठे गेले असा सवाल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी काही शहाणपणाच्या गोष्टीही नमूद केल्या. 1990 मध्ये जेव्हा आर्थिक धोरणे अपुरी पडली, चुकत असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मोठे बदल आवश्यक होते; धाडसीपणे 1991 ते 2012 या काळात व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. आताही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे केंद्र सरकारने मान्य केले पाहिजे आणि त्यासाठी योग्य सल्ले, मार्गदर्शन घेतले पाहिजे. तसे लोक उपलब्ध नसतील तर असा अनुभव काँग्रेस पक्षाकडे आहे. तर त्यांनी त्यांची मदत घेतली पाहिजे. आम्ही त्यासाठी मार्गदर्शन करायला तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. असा विचार करण्यासाठी आधी सरकारला जनतेप्रती संवेदनशील व्हावे लागेल. मात्र ते अधिकाधिक भार जनतेवर लादण्यात मश्गुल आहे. पूर्वीच्या काळी दुष्काळातही सावकार जसे गोरगरीब शेतकर्‍यांना कराच्या ओझ्याखाली पिचून टाकायचे, तसे हे सरकार लूटमार करताना दिसत आहे. एक तर त्यांनी या सगळ्या पैशाचा हिशोब द्यावा, या दरामागचे अर्थकारण समजवावे व त्यात देशाचे हित कसे राखले जाते हे स्पष्ट करावे. मात्र त्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नाही हे सत्य आहे. काही महिन्यांपूर्वी तेव्हाचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत स्पष्टीकरण लसीकरण खर्चाद्वारे देण्याचा प्रयत्न केला होतो. लवकरच त्यांचे खाते गेले. त्यानंतर आलेले पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग सुरी यांनी या बाबतीत कोणतेही विधान केलेले नाही. अर्थमंत्रीही मौन आहेत. हा सर्वांच्या रोजच्या जगण्याशी संबंध असलेला विषय आहे. जीएसटी भरणा वाढला, जीडीपी वाढला अशी जाहिरातबाजी करून काही होत नाही. न्याय्य दराने गॅस सिलिंडर उपलब्ध झाला पाहिजे, पेट्रोल आणि डिझेलही तसेच उपलब्ध व्हायला पाहिजे आणि ही सरकारी लूट थांबलीच पाहिजे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आ. जयंत पाटील यांच्याकडून लसीकरण मोहिमेचे कौतुक

Next Post

शासनाकडूनच शिक्षणाची ‘शाळा’

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
शासनाकडूनच शिक्षणाची ‘शाळा’

शासनाकडूनच शिक्षणाची ‘शाळा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?