• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जीएसटीबाबत अव्वल, गृहविक्रीत घसरण

Varsha Mehata by Varsha Mehata
April 12, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महेश देशपांडे

जीएसटी संकलनात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर राहिल्याची बातमी सरत्या काळात लक्षवेधी ठरली. मात्र मार्च 2023 मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घरांची विक्री घटल्याची बातमी प्रश्‍न उपस्थित करुन गेली. दरम्यान, मंदीमुळे आयटी क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होत असल्याची आणि अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची योजना आंतरराष्ट्रीय पातळीवर आकाराला येत असल्याची वार्ता अलिकडच्या काळातली खास बात ठरली.

अर्थजगतात ‘कही खुशी, कही गम’वाला माहोल कायम आहे. त्यातल्या त्यात जीएसटी संकलनात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर  राहिल्याची बातमी लक्षवेधी ठरली. मात्र मार्च 2023 मध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घरांची विक्री घटल्याची बातमी कुतुहल निर्माण करणारी ठरली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक काहीसे निराश झाले. दरम्यान, मंदीमुळे आयटी क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होत असल्याच्या आणि अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची योजना आंतरराष्ट्रीय पातळीवर आकाराला येत असल्याची वार्ता अलिकडच्या काळातली खास बात ठरली.
देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनाने सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. मार्च 2023 मध्ये देशाचे जीएसटी संकलन एक लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके झाले. जीएसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे संकलन आहे. दखलपात्र बाब म्हणजे महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे. देशातील जीएसटीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वोच्च महसूल संकलन आहे. एप्रिल 2022 नंतरचे हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च मासिक संकलन आहे. मार्च 2023 च्या जीएसटी संकलनातील विशेष बाब म्हणजे सलग 14 महिने जीएसटी संकलन हे एक लाख 40 हजार कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये जीएसटी महसुलात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
2022-23 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 18 लाख दहा हजार कोटी रुपये जीएसटी कर जमा करण्यात आला. दर महिन्याला सरासरी एक लाख 51 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला. 2022-23 मध्ये 2021-22 च्या तुलनेत 22 टक्के अधिक जीएसटी जमा झाला. मार्च 2023 मध्ये एकत्रित जीएसटी महसूल एक लाख 60 हजार 122 कोटी आहे. यामध्ये सीजीएसटी 29 हजार 546 कोटी, एसडीएसटी 37 हजार 314 कोटी, आयजीएसटी हा 82 हजार 907 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42 हजार 503 कोटींसह) असे प्रमाण आहे. मार्च 2023 मध्येही सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रातून करण्यात आले. महाराष्ट्रातून 22 हजार 695 कोटी जीएसटी जमा करण्यात आला. दुसर्‍या क्रमांकावर गुजरात राज्य आहे. गुजरातमधून 9919 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला. तिसर्‍या स्थानावरील तामिळनाडूमधून 9245 कोटींचा जीएसटी जमा झाला. हरयाणामधून 7780 कोटींचा जीएसटी जमा झाला.
बांधकाम व्यवसायिकांसाठी मार्च महिना हा गेल्या वर्षीच्या तुलनेत निराशाजनक ठरला. मार्च 2023 मध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीत जवळपास 12 हजार 421 नव्या घरांची नोंदणी झाली. ही नोंदणी मार्च 2022 च्या तुलनेत 26 टक्क्यांनी कमी आहे. मात्र यातून राज्य सरकारला तब्बल 1,143 कोटी रूपयांचा महसूल मिळाला. यामुळे मुंबईत एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’ या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीने ही आकडेवारी जाहीर केली. या संस्थेने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्याने मुंबईतील मालमत्तेची विक्री चांगली राहिली. मार्च 2023 मध्ये मालमत्तेची नोंदणी दररोज सरासरी 401 युनिट्स होती. त्यामुळे मार्च 2021 नंतर गेल्या दहा वर्षांमधला हा तिसरा सर्वोत्तम मार्च महिना ठरला. मुद्रांक शुल्ककपातीच्या फायद्यांमुळे मार्च 2021 मध्ये सर्वाधिक सरासरी दैनंदिन विक्री 572 युनिट्स झाली. मार्च 2022 मध्ये मेट्रोचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी मालमत्तेच्या नोंदणीमध्ये झालेल्या गर्दीमुळे सरासरी दररोज 540 युनिट्सच्या विक्रीसह मालमत्ता नोंदणीमध्ये वाढ झाली.
‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होऊनही मार्चमध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटची ताकद दिसून आली. मार्च 2023 मध्ये आर्थिक वर्ष 2023 मधील सर्वाधिक  मालमत्तेच्या नोंदणीत वाढ झाली आहे. स्वतःचे घर असावे, या दृढ इच्छेमुळे मालमत्तेच्या नोंदणीत वाढ झाल्याने राज्याच्या तिजोरीत लक्षणीय नफा दिसला. यामुळे मुंबई प्रॉपर्टी मार्केट आणखी मजबूत झाले. मार्च 2023 मध्ये 500 चौरस फूट  ते एक हजार चौरस फूट आकाराची घरे ही खरेदीदारांची पसंती राहिली. या आकारातील घरांची संख्या एकूण अपार्टमेंट्सपैकी 48 टक्के होती. 500 चौरस फुटापेक्षा कमी असलेल्या अपार्टमेंट्सचा बाजार हिस्सा जानेवारी 2023 मधील 35 टक्क्यांवरून मार्च 2023 मध्ये 34 टक्क्यांवर घसरला. एक हजार चौरस फुटापेक्षा मोठ्या क्षेत्रासाठीचा हिस्सा फेब्रुवारी 2023 मधील 21 टक्क्यांवरून मार्च 2023 मध्ये 17 टक्क्यांपर्यंत घसरला.
दरम्यान, जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतासह जगभरात आयटी कंपन्यांमध्ये  मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जात आहे. यामध्ये अनेक भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. आर्थिक मंदीच्या सावटामुळे सुरू असलेल्या नोकरकपातीचा परिणाम कॅम्पस हायरिंगवर दिसून येत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये आयटी सेक्टरमधील 40 टक्के नोकर्‍यांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. ‘टीम लीज’च्या डेटाच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय आयटी कंपन्या 40 टक्क्यांपर्यंत कमी भरती करू शकतात, असे ‘टीम लीज’ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘टीम लीज’ डेटानुसार 2023 या आर्थिक वर्षात, आयटी कंपन्यांनी एकूण 2.8 लाख लोकांची भरती केली आहे. त्याचबरोबर पुढील वर्षापर्यंत त्यात सुमारे 30 ते 40 टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाऊ शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये कंपन्यांचा ग्रोथ रेट कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम क्षेत्रातील नोकरभरतीवर दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मागील एक वर्ष चांगले राहिले नाही. या काळात आयटी कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आव्हाने वाढली आहेत, तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटांमुळे अडचणी अनेक पटींनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बदलती जागतिक परिस्थिती पाहता भारतीय आयटी कंपन्यांना कमीत कमी पैसा खर्च करायचा आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी नवी भरती कमी राहू शकते. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या आयटी सेक्टरमध्ये या वर्षी एकूण तीन लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ‘ले ऑफ फाय’ च्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2023 दरम्यानच्या आकडेवारीनुसार, 500 हून अधिक आयटी कंपन्यांनी 1.5 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये झालेल्या नोकरकपातीमुळे भारतातील किमान 36 हजार चारशे जण बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे, 2022 मध्ये एकूण 1.6 लाख लोकांना टेक कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. नोकरकपात करणार्‍या कंपन्यांमध्ये ट्विटर, मेटा, अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
याच सुमारास एका खास बातमीने लक्ष वेधले. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोरील आव्हाने येत्या काही काळात वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरचे वर्चस्व आहे. आता याच अमेरिकन डॉलरचे वर्चस्व संपुष्टात येणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अलिकडेच रशियाच्या दौर्‍यावर होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देताना सांगितले की, रशिया आशियाई, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांसोबत चीनचे चलन असलेल्या युआनमध्ये व्यवहार करण्याच्या बाजूने आहे. या प्रयत्नातून चीन आणि जगातील सर्वात मोठे ऊर्जा निर्यातदार रशिया यांना जागतिक आर्थिक व्यवस्थेतील डॉलरची धमक संपवायची आहे. असे घडले तर हा अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या वर्चस्वामागे अनेक ठोस कारणे आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला एकच चलन आवश्यक आहे जे स्थिर आणि सहज उपलब्ध असेल. त्या चलनाद्वारे कोणालाही, कधीही व्यवहार करता यावा. बाजाराने चलनाचे मूल्य नियंत्रित करणे अपेक्षित आहे. हे नियंत्रण कोणत्याही देशाने करणे अपेक्षित नाही. आज जगात डॉलरला मागणी आहे. त्यामुळे चिनी युआनला आंतरराष्ट्रीय अर्थकारणात डॉलरला आव्हान देणे सोपे असणार नाही. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

‘नंदिनी’चा धडा

Next Post

कर्जत-खोपोली-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना महत्वाची सूचना

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
कर्जत-खोपोली-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना महत्वाची सूचना

कर्जत-खोपोली-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना महत्वाची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?