• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

उद्योगक्षेत्रात असर, सामान्यांची काटकसर

Varsha Mehata by Varsha Mehata
April 18, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
148
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 महेश देशपांडे

सरकार वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी देशात सात टेक्सटाईल प्लांट्स उभारणार असल्याची बातमी आहे. याच सुमारास गृहकर्ज महाग होऊनही घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करण्याची सुविधा बँकिंग क्षेत्र उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती अलिकडेच समोर आली. एकिकडे या सुधारणा दिसत असल्या तरी महागाईमुळे लोकांकडून खर्चात जोरदार काटकसर केली जात आहे.

देशात पायाभूत सुविधा उभारणीसंदर्भात मोठे काम होत आहे. यामध्ये उद्योगांकडेही बारीक लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने अलिकडेच झालेल्या एका घोषणेची दखल घ्यावी लागते. सरकार देशात सात टेक्सटाईल प्लांट्स उभारणार असल्याची बातमी आहे. दरम्यान, खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे कसे शक्य होणार याबाबतची माहिती अलिकडेच समोर आली. दरम्यान, महागाईमुळे लोकांकडून खर्चात काटकसर कशी केली जात आहे, हे अलिकडेच पहायला मिळाले. याच सुमारास  गृहकर्ज महाग होऊनही घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले.
 ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने देशात सात टेक्सटाईल प्लांट्स उभारण्याची योजना जाहीर केली आहे. प्रधानमंत्री मित्र योजनेंतर्गत हे सात प्लांट तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जाणार आहेत. या व्यवसायातून 20 लाख लोकांना रोजगार मिळेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पीएम मित्र योजना ऑक्टोबर 2021 मध्ये चार हजार 445 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू करण्यात आली आहे. 17 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की वस्त्रोद्योग क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर वर्ल्ड’चे हे उत्तम उदाहरण आहे. या अंतर्गत सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना असून 20 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशभरात वस्त्रोद्योग असंघटित राहिला आहे. या वाढलेल्या खर्चाचा आणि लॉजिस्टिक खर्चाचा परिणाम देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रावर झाला आहे. पंतप्रधानांच्या या आदेशामुळे अनेक समस्या दूर होतील. वस्त्रोद्योग सचिव रचना शाह म्हणाल्या की त्यांच्या मंत्रालयाने 13 राज्यांमधील 18 प्रस्तावांचा विचार करून पारदर्शक पद्धतीने गुंतवणूकयोग्य शहरांची निवड केली आहे. या निवडीनंतर कनेक्टिव्हिटी, विद्यमान परिसंस्था, वस्त्रोद्योग, उद्योग धोरण, पायाभूत सुविधा, उपयुक्तता सेवा आणि इतर समस्या दूर केल्या जातील. याशिवाय, पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा वापर मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी केला जाईल. पीएम मित्र पार्क योजना हे एक अनोखे मॉडेल आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीत वाढ करणे, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करणे आणि देशाला कापड उत्पादन आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहकार्याचा समावेश आहे. यातून खरोखरच किती रोजगारनिर्मिती होते, हे आता पहायचे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. यापैकी ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’द्वारे बँकांमध्ये ‘प्री-सेक्शन क्रेडिटलाइन ऑपरेट’करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे खात्यात पैसे नसले तरी पेमेंट करता येईल; मात्र त्यासाठी खाते ‘युपीआय’शी लिंक करावे लागेल. याबाबत घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळेल. ‘युपीआय’ने भारतातील पेमेंटची पद्धत बदलली आहे. वेळोवेळी उत्पादने आणि वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी ‘युपीआय’ मजबूत करण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत. याशिवाय रुपे क्रेडिट कार्ड ‘युपीआय’शी लिंक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता ‘युपीआय’ थेट बँक खात्याशी लिंक करून पेमेंट करता येते. त्याच वेळी, ‘पेमेंट अ‍ॅप’च्या मदतीने वॉलेट वापरूनदेखील पेमेंट केले जाऊ शकते. याशिवाय रुपे क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करता येते. रिझर्व्ह बँकेच्या नव्या घोषणेमुळे खात्यात पैसे नसले तरी पेमेंट केले जाईल. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर, ग्राहक त्यांच्या बँक ठेवींमधून तसेच पूर्व-मंजूर क्रेडिट्समधून ‘युपीआय’ पेमेंट करू शकतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘युपीआय’ नेटवर्कद्वारे, ग्राहक पेमेंटसाठी बँकांनी दिलेल्या क्रेडिटचादेखील वापर करू शकतील. ‘युपीआय’वर क्रेडिट लाइनची सुविधा ग्राहकांसाठी ‘पॉइंट-ऑफ-परचेस’चा अनुभव अधिक चांगला आणि सुलभ करेल. यामुळे लोकांना क्रेडिट कार्डची संख्या कमी करून ‘युपीआय’द्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल.
एकिकडे ही तयारी होत असताना सामान्यजनांचे रोजचे जगणे मात्र अवघड होत आहे आणि त्यावर त्यांना स्वत:च इलाज शोधावा लागत आहे. महागाई आणि त्यावर नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आलेल्या उपायांचा अलिकडेच खोल परिणाम दिसून आला. 74 टक्के भारतीय वैयक्तिक खर्च आणि बचतीबद्दल चिंतेत आहेत. यामुळे निम्म्याहून अधिक लोक रेस्टॉरंटमधील जेवणासारखे अनावश्यक खर्च कमी करु पहात आहेत. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दरात वाढ न करून सर्वसामान्यांना दिलासा दिला असतानाही सर्वत्र बचतीचे प्रयत्न पहायला मिळत आहेत. ‘पीडब्ल्यूसी ग्लोबल कंझ्युमर इनसाइट्स पल्स’ने केलेल्या सर्वेक्षणात दहापैकी सहा भारतीयांनी (63 टक्के) सांगितले की, ते पुढील सहा महिन्यांमध्ये अनावश्यक खर्च कमी करतील. दिल्ली, मुंबई यासारख्या 12 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार एका वर्षापासून वाढत्या महागाईमुळे भारतीय दैनंदिन खर्चाबाबत मोठ्या संख्येने चिंतेत आहेत; पण तरुणवर्ग ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’ सुरु ठेवेल, असे दिसते. सर्वेक्षणात आढळून आलेला एक वेगळा कल असा की 1997 किंवा नंतर जन्मलेले तरुण आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीला जन्मलेले भारतीय ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’ सुरू ठेवतील. सर्वेक्षण अहवालानुसार 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक देशात उत्पादित केल्या जाणार्‍या आणि पर्यावरणाला अनुकूल असलेल्या उत्पादनांवर थोडा जास्त खर्च करण्यास तयार आहेत. त्यात पुनर्वापर केलेल्या वस्तूंपासून बनवलेल्या उत्पादनांचाही समावेश आहे. देशातील सर्वसामान्य ग्राहक पुढील सहा महिन्यांसाठी बचतीचे मार्ग अवलंबतील. बचतीवरील ताणाचा इलेक्ट्रॉनिक्स आणि लक्झरी उत्पादनांच्या खर्चावर परिणाम होईल.
आता खबरबात रिअल इस्टेट क्षेत्राची. जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये देशातल्या सात मोठ्या शहरांमध्ये 62 हजार घरांची विक्री झाली. 2022 मध्ये याच तिमाहीमध्ये विक्री झालेल्या घरांपेक्षा हे प्रमाण 20 टक्के जास्त आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज महाग झाले असताना देशात घरांची विक्री वाढली आहे. देशभरात घरांच्या किमती 4 ते 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चांगली सुविधा आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या भागातील प्रीमियम घरांची मागणी सलग वाढत आहे. ‘जेएलएल’ या रिअल इस्टेट सेवा कंपनीच्या अहवालानुसार, देशातील अग्रगण्य गृहनिर्माण बाजारपेठेत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांचा हिस्सा 22 टक्क्यांपर्यंत वाढला. 2022 च्या जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये हा आकडा 18 टक्के होता. बंगळुरु शहरात घरांची विक्री सर्वाधिक वाढली.
घरांच्या विक्रीमध्ये 21 टक्क्यांच्या भागीदारीसह बंगळुरु टॉपवर राहिले, 20.9 टक्के प्रमाणासह मुंबई दुसर्‍या स्थानी तर पुणे 19.4 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिले. सात मोठ्या शहरांमध्ये घरांच्या एकूण विक्रीमध्ये 61 टक्के हिस्सा बंगळुरु, मुंबई, पुण्याचा आहे. जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 7,800 प्लॉट्स आणि बंगल्यांची विक्री झाली. जानेवारी-मार्चमध्ये 75 हजार घरे लाँच करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 2.5 टक्के वाढ करूनही 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये रहिवासी क्षेत्राने चांगली वाढ केली. हा घरांच्या किमती वाढण्याचा संकेत आहे. एकूण विक्रीमध्ये परवडणारे विभाग म्हणजेच 50 लाख रुपयांपेक्षा कमी भावाच्या घरांचा वाटा 22 टक्क्यांवरून घटून 18 टक्के राहिला. मध्य विभागातील घरांचा हिस्सा (म्हणजे 50-75 लाख रुपये किंमतीच्या) सुमारे 25 टक्के होता. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता ही टॉप सात शहरे निवासी घरांची हक्काची बाजारपेठ बनली आहेत. 

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

फूटपाड्यांना थप्पड

Next Post

खारघर उष्माघात घटना: मृतांची संख्या १४ वर; १० महिला, ४ पुरुषांचा समावेश

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
असा रंगला महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळा

खारघर उष्माघात घटना: मृतांची संख्या १४ वर; १० महिला, ४ पुरुषांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?