विनाअपघात एसटी चालवणार्‍या चालकांचा सत्कार

| कर्जत | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे रस्ते सुरक्षितता मोहीम अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ कर्जत आगारात करण्यात आला. या वेळी 25 वर्षे विनाअपघात एसटी चालवत असलेल्या चालकांचा सत्कार करण्यात आला. 25 जानेवारीपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे.

कर्जत एस टी आगारात या रस्ते सुरक्षितता मोहीम अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी रमेश पोवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक शंकर यादव, अप्पा गोकाककर लेखाकार अंकुश राठोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी 25 वर्षे विना अपघात एसटी चालवणार्‍या सुनील चव्हाण व संजय गाढे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले. याप्रसंगी चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version