| अलिबाग | प्रतिनीधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील पत्रकार दिपक यशवंत पाटील यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.आद्य शिक्षिका, कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त भाई जगताप मित्रमंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाऊंडेशन रायगड, मधूशेठ ठाकुर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 3 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सातिर्जे मैदान, अलिबाग-रायगड येथे सायंकाळी 5:30 वाजता युवक मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत राहून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्याच्या कार्याची दखल घेत त्यांची कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2024 साठी निवड केली आहे. तसे पत्र संस्थेचे अध्यक्ष अॅड. उमेश ठाकूर यांच्यावतीने त्यांना देण्यात आले आहे. याबद्दल यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.