कुणबी समाजाची सभा उत्साहात

| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कुणबी समजोन्नोती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर चणेरा विभाग, धाटाव विभाग, कोलाड विभाग, ऐनघर विभाग, नागोठणे विभाग, सोनगाव विभाग कुणबी समाज ग्रुप जसे कार्यविहित झाले आहेत. त्याचा आदर्श इतर विभागीय कुणबी समाज ग्रुपने घेतला पाहिजे, याकरिता पुन्हा कुणबी समाज ग्रुपची पुनर्बांधणी करणार असल्याचे प्रतिपादन रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले. कुणबी समाज तालुका कार्यकारिणीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित समाज नेते रामचंद्र सकपाळ, रोहा उपाध्यक्ष मारुती खांडेकर, ओबीसी संघर्ष समिती व जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, शंकरराव भगत,शिवराम महाबळे,दत्ताराम झोलगे सरचिटणीस,रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे,महेश ठाकूर,सुनिल ठाकूर,सुहास खरीवले,चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष गुणाजी पोटफोडे,काशिनाथ भोईर, आदी कार्यकरणी सभासद उपस्थित होते.

Exit mobile version