गोवे गावात घरात पाणी शिरून लोकांचे मोठे नुकसान
| कोलाड | प्रतिनिधी |
गेले आठ दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन कुंडलिका नदीची उपनदी महिसदरा नदीनी धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे पुराचे पाणी गोवे गावातील घरात शिरून जीवनावश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. शिवाय या पाण्यामुळे सर्व रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आठ दिवस सतत पाऊस पडेल हा अंदाज खरा ठरला असुन कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली कोलाड पाटबंधारे खात्याकडून दिलेल्या आकडेवाडी नुसार बुधवारी (दि.24) मध्यरात्री 1.00 वाजता देण्यात आलेल्या आकडेवारी नुसार कुंडलिका नदीची इशारा पातळी 23 मिटर असुन धोक्याची 23.95 होती ती ओलांडून 25 पर्यंत गेल्यामुळे, कोलाड रोहा रस्त्यावरील आंबेवाडी गौरी नगर,संभे, पाले खुर्द पाले बु. आंबेवाडी, नाना नानी पार्क,आंबेवाडी बाजारपेठेत पाण्याखाली गेली असुन येथील व्यापारी वर्गाचे ही मोठे नुकसान झाले आहे.
तसेच गोवे गावातील नवीन गावठाण, बौद्ध वाडी, आदिवासी वाडी तसेच गोवे गावातील काही घरामध्ये पाणी शिरले असुन जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे. तर पाण्यात, ड्रम, कोंबड्या, लाकडे पाण्यात वाहून गेली परंतु रात्री एक वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत येथील तरुणांनी प्रसंगावधान दाखवत असंख्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हळविण्यात आले तसेच महिसदरा नदीला संवरक्षण भिंत नसल्याने सर्व पाणी भातशेतीमध्ये घुसल्यामुळे भातशेती ही पाण्याखाली गेली यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा 1989 व 2005 मधील आठवणी जाग्या झाल्या.