| नवी दिल्ली | वार्ताहर |
हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या प्रदीप कुरुलकरच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे झालेत. फक्त शरीरसुखासाठी कुरुलकरने झारा या पाकिस्तानी एजंटसोबत राफेल विमानांपासून ते अग्नी, ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गुपितं फोडल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर मध्यम पल्ल्याचं मानवरहीत हवाई क्षेपणास्त्र रुस्तम, मानवरहित कॉम्बॅट एअर व्हेइकल्स, ड्रोन प्रकल्प अशा अनेक संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण केल्याचंही उघड झाले आहे. ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे.