| पोलादपूर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील चिरेखिंड येथे रविवारी रात्री दरडी कोसळल्याची घटना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोलादपूर पोलीसांनी गेल्या आठवडयापासून पोलादपूर आंबेनळी घाटरस्त्यामार्गे महाबळेश्वर ते वाई सुरूर या राज्यमार्गाची वाहतूक बंद असल्याचे फलक व बॅरिकेटस् या मार्गाच्या प्रारंभीच पोलादपूर येथील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ लावल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊन कोणताही धोका उदभवला नाही.
रविवारी रात्री प्रतापगड ते चिरेखिंड दरम्यान गेल्या 15 दिवसांतील तिसरी घटना झाल्यानंतर प्रतापगड सर्च ऍंड रेस्क्यू टीम च्या सदस्यांनी घटनेची माहिती पोलादपूर पोलिस ठाण्यात तात्काळ कळवली. टीमचे सदस्य अविनाश केळगेने, अजित जाधव दर्शन जाधव, अनिकेत वागदरे, श्रेया वागदरे, अथर्व दळवी, स्थानिक काँट्रॅक्टर बाळासाहेब पार्टे आणि पोलादपूर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी वर्ग घटनास्थळी मदतीला हजर होते.