स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान

| पनवेल | वार्ताहर |

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महर्षी वाल्मिकी शाखेच्या ज्येष्ठ नागरिक सदस्याकडून स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात.

समाजातील सर्व घटकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या दृष्टीने शहरातील उद्याने, पर्यटन स्थळे, स्मृतीस्थळे यांठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असते. वर्षाचा शेवट हा चांगल्या कामाने करावा, समाजबांधीलकी या नात्याने समाजोपयोगी काम करून करावा या उद्देशाने , पनवेलमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानामध्ये महापालिकेचा स्वच्छता विभागाचे कर्मचारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महर्षी वाल्मिकी शाखेच्या ज्येष्ठ नागरिक सदस्याकडून स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान करण्यात आले. नव्या वर्षाचे स्वागत करताना आणि 2023 वर्षाला निरोप देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महर्षी वाल्मिकी शाखेच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने पनवेलच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात अतिशय उत्साहात स्वच्छता मोहिमेअंतर्गत श्रमदान केले. यावेळी त्याचा उत्साह वाखण्ण्यासारखा होता. शहरातील लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांवरती सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने या जेष्ठ नागरिक सदस्यांनी केलेले श्रमदान खरोखरच प्रेरणादायी आहे.

Exit mobile version