कोर्लई किल्ल्यावर सुविधाचा अभाव

पर्यटकांना मात्र आकर्षणच; पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

| रेवदंडा | प्रतिनिधी |

पोर्तुगीज कालीन कोर्लई किल्ला पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे, मुरूड पर्यटनात पर्यटक कोर्लई पहाण्यासाठी हमखास भेट देतो, परंतू पर्यटकांना खुणावणारा कोर्लई किल्लात पर्यटकांना सुविधाच्या अभाव आढळत असून पुरातत्व खात्याचे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे.

साळाव या मुरूडच्या प्रवेशद्वारानजीक दोन किमी अंतरावर असलेला कोर्लई किल्ला सुध्दा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. तिन्ही बाजूस असलेल्या समुद्रावर चौफेर नजर ठेवण्यास उपयुक्त असा हा ऐतिहासिक पोर्तुगिज बनावटीचा किल्ला आजही समस्त पर्यटकांना आकर्षित करीत आला आहे. मात्र तेथे जाण्यासाठी मार्गफलक फलकांचा अभाव असल्याने पर्यटकांना रस्ता किल्लात जाण्याकडे रस्ता शोधावा लागतो. किल्ल्यानजीक जाताना गाईड उपलब्ध नसल्याने किल्लात कोठून प्रवेश करावा, हा मोठा प्रश्‍न पडतो.

किल्ल्यात जाण्यासाठी एक दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक मार्गाने पायर्‍याचा मार्ग सुध्दा नादुरुस्त असल्याने अवघड बनला आहे, तर दुसरा बाजूकडून जाताना झाडीझूडूपातून रस्ता शोधत पर्यटक व किल्ला प्रेमी मंडळीना मार्गक्रमण करावा लागतो. किल्लातील मार्गक्रमणातील अडचणी दुर करत किल्लात प्रवेश केल्यावर जिकडे तिकडे अवास्तव वाढलेले गवत, तसेच रानटी झाडीझुडपी त्रासदायक ठरतात. पर्यटकांना किल्लात फिरताना यामुळे समस्या निर्माण होते. चार वर्षापासून किल्लाचा बुरूज ढासळला असून अदयापी बुरूजाचे संवर्धन करण्यात आलेले नाही. किल्लावर साफसफाई करीता एकच कर्मचारीवर्ग असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य वाढले असून पाण्याची कमतरता जाणवते. किल्लावर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधाची उपलब्धता नसल्याने येथे येणारा पर्यटक निरूत्साही होतो.

किल्लावरील गैरसोयीबाबत कोर्लई ग्रा.प.सरपंच प्रशांत मिसाळ यांनी पुरातत्व खात्यास लेखी निवेदन दिले असून किल्लावर साफसफाई करीता कर्मचारीवर्ग वाढविणे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय,किल्ल्याकडे ये जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याची, पायर्‍यांची दुरूस्ती तसेच मार्गफलक लावणे आदीबाबत मागणी यामध्ये केली आहे.

Exit mobile version