| तळा | प्रतिनिधी |
तळा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले असून रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे तालुक्यातील रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान, तळा शहरातील राजेंद्र अडसुळे हे शिडीवरून पाय घसरून खाली पडले व त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पायाचा एक्सरे काढण्याची गरज होती. परंतु, रूग्णालयातील एक्सरे मशील बंद असल्याने त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यांना चालता येत नसल्याने ॲमब्युलन्सने नेण्याचे ठरविले. परंतु, ती देखील उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी वाहनाने माणगावमध्ये नेण्यात आले. परंतु, त्या ठिकाणी देखील हिच परिस्थिती होती. त्यामुळे नाहिलाजास्तव त्यांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. या सर्व धावपळीत त्यांचा प्रचंड वेळ वाया तर गेलाच पंरतु आर्थिक भुर्र्दंड देखील पडला. त्यामुळे तळा येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कमालीची गैरसोय होत आहे.







