नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कामाला लावून देण्याचे आमिष दाखवून 15 व्यक्तींकडून तब्बल 5 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ज्ञानेश्वर नथू राठोड असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, सानपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. ज्ञानेश्वर राठोड याच्याविरोधात 15 व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी, त्याने यापेक्षा अधिक लोकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version