लाखोंचे ड्रग्स हस्तगत

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमधून एका नायजेरियन व्यक्तीला अटक करून त्याचडून 6 लाखांचा एमडी हस्तगत करण्यात आला. खारघर पोलिसांनी सध्याकाळी सापळा रचून ही कारवाई केली आहे. खारघर सेक्टर 13 येथे एक नायजेरियन व्यक्ती ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या पथकाने तिथल्या बसथांब्यावर सापळा रचला होता. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच एक नायजेरियन व्यक्तीने पळ काढला. यामुळे त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 60 ग्रॅम एमडी हा ड्रग्स आढळून आला. चुकवुएबुका अबेल उदेह असे अटक नायजेरियन व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा नायजेरियाचा आहे.

Exit mobile version