| नागोठणे | प्रतिनिधी |
रोहाजवळील धामणसई गावच्या रहिवासी आणि गावातील महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ लक्ष्मीबाई पांडुरंग महाडिक (103) यांचे नुकतेच वयोवृद्धत्वामुळे निधन झाले. मूळचे धामणसई व व्यवसायानिमित्त नागोठणे येथे स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते मधुकर महाडिक आणि नंदकुमार महाडिक यांच्या त्या मातोश्री होत. लक्ष्मीबाई महाडिक यांच्या निधनाने पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, पातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दि.17 डिसेंबर रोजी राहत्या घरी धामणसई येथे होणार आहे. त्यानिमित्त वांदोली येथील ह.भ.प.दिनेश महाराज कडव यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आल्याची माहिती मधुकर महाडिक यांनी दिली.







