| नवी दिल्ली | वार्ताहर |
भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन याला पराभवाचा धक्का बसला. प्रियांशू राजावत या भारताच्याच खेळाडूकडून लक्ष्य याचे आव्हान एक तास पंधरा मिनिटांच्या झुंजीनंतर संपुष्टात आले. एच. एस. प्रणोय यानेही पुरुषांच्या एकेरीत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत पुढे पाऊल टाकले. इंडिया ओपन बॅटमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली.
प्रियांशू राजावत याने लक्ष्य सेन याच्यावर 16-21, 21-16, 21-13 असा तीन गेममध्ये विजय संपादन केला. पहिला गेम पराभूत झाल्यानंतरही त्याने या लढतीत विजयाला गवसणी घातली. एच. एस. प्रणोय याने चाऊ टिएन चेन याच्यावर 21-6, 21-19 अशी मात केली. प्रणोय याने 42 मिनिटांमध्ये विजयावर मोहोर उमटवली. वँग वेई याने किरण जॉर्जला 21-12, 21-15 असे पराभूत करताना या स्पर्धेमध्ये आगेकूच केली.