ललिता पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा

। वाघ्रण । वार्ताहार ।

ना.ना. पाटील हायस्कूलच्या सुलभाकाकू सभागृहात इंग्रजी पेझारी माध्यमिक विभागाच्या प्राचार्या ललिता किशोर पाटील यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. को.ए.सो.ना. ना. संकुलाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली सदर सेवापूर्तीचा कार्यक्रम पार पडला.

इंग्रजी माध्यमिक शाळेने सौभाग्याचे वस्र देऊन ओटी भरली. सर्व सेवकांनी घेतलेली भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी प्रदिर्घ सेवे बद्धल आणि मिळालेल्या सहकार्या बद्दल शिक्षिका प्रिया पाटील, तृप्ती पाटील, पूनम धुमाळ, राजश्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना ललिता पाटील यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय पाटील, विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ पाटील आणि संस्थेतील सर्व पदाधिकारी याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी दिलेल्या सेवेच्या संधी करीता विशेष कृतज्ञता व्यक्त केली. इंग्रजी माध्यमिक शाळेचे चेअरमन अ‍ॅड. आस्वाद पाटील आणि सर्व पाटील कुटुंबियानी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Exit mobile version