। जेएनपीटी । वार्ताहर ।
मोठी जुई ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच आशा हासूराम भोईर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या मोठी जुई ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ललिता जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पाटील यांची सर्वानुमते मोठी जुई ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड होताच प्रभारी सरपंच आशा भोईर, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील,शेखर केणी, उत्तम भोईर, दिपक भोईर, तुषार पाटील, माधुरी भोईर, सुरेखा भोपी, अश्विनी भोपी, तेजश्री भोईर, रुपम गावंड, विनोद म्हात्रे, घनश्याम पाटील तसेच इतर पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित सरपंच यांना त्यांचे अभिनंदन केले.







