लालपरीचेही तिरंग्याला अभिवादन

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुंबई सेंट्रल स्थानकात भरविण्यात आलेल्या सचित्र प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली.

ध्वजारोहण प्रसंगी विविध विभागांचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर श्री. चन्ने यांनी मुंबई सेंट्रल बसस्थानकाची पाहणी केली.

महाराष्ट्रातील प्रमुख 8 शहरातील बसस्थानकावर (मुंबई सेंट्रल बसस्थानक, पुणे येथील स्वारगेट बसस्थानक, नाशिक मध्यवर्ती बसस्थानक, अमरावती मध्यवर्ती बसस्थानक, नागपूर मध्यवर्ती बसस्थानक, तारकपूर अहमदनगर बसस्थानक, सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक) हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

Exit mobile version