। सुकेळी । वार्ताहर ।
महाड -बोरीवली ही बस महामार्गावरील कानसई गावाच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना दुसर्या गाडीची वाट बघत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच वातावरणामध्ये उष्णता असल्यामुळे काही प्रवाशांना चक्कर आली होती. मुंबई बाजुकडे जाणार्या सर्वच बसेस फुल्ल असल्यामुळे दुसर्या बसची वाट बघत बसलेल्या प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. तर काहींना मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागला.
महामार्गावर लालपरी बंद; प्रवाशांचे हाल
