| सुकेळी | वार्ताहर |
वाकण नाक्यावरील रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांच्या कचऱ्याचा ढीग पडलेला दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन दररोज ये-जा करणाऱ्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याच वाकण नाक्यावरुन अनेक प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. पनवेल-मुंबईकडे तसेच कोलाड-महाडकडे जाणारे प्रवासी ज्या ठिकाणी एसटी बस किंवा इतर गाड्यांची वाट पाहत उभे रहावे लागते. परंतू, तेथेच बाजूला प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा तसेच नाक्यावरील काही हॉटेलमधील उरलेसुरले अन्नपदार्थ तेथे टाकले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी गाडीची वाट बघत असणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल बांधून गाडीची वाट बघत उभे रहावे लागत आहे. या कचऱ्याच्या बाबतीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.