घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात चोरांनी तळोजा येथील घोटगावातील अरिहंत अन्शूना या इमारतीत घरफोडी करून सुमारे सहा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार काशिनाथ बाविस्कर(62)हे तळोजा घाटेगाव येथील अरिहंत अन्शूना या इमारतीतील पत्नीसह राहण्यास आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींचा विवाह झाला असून त्यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. बाविस्कर हे बाहेर गेले असता त्यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील दोन लाख 10 हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा एकूण सहा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरून पलायन केले. बाविस्कर घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version