मोठी बातमी! माथेरानमध्ये भूस्खलन; प्रशासन घटनास्थळी दाखल

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
दरड कोसळून इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर माथेरान डोगरातील धोदानी परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मंगळवारी (दि.25) रात्री घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार माथेरान डोंगरातील मंकी पॉईंट आणि सनसेट पॉईंटच्या मधल्या वरच्या भागात बारमाही वाहणारा झरा आहे. या ठिकाणी काही प्रमाणात भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या भूस्खलनाच्या प्रकारामुळे अद्याप गावाला धोका नसला तरी सतत सुरु असलेल्या पावसामुळे परिसरातील दहा ते बारा आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पनवेलचे तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस प्रशासन रात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. तर स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आपत्कालिन पथकातील कार्यकर्तेदेखील प्रशासनाच्या मदतीसाठी पोहचले होते.

Exit mobile version