रेती उपशामुळे रेल्वे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता
| पनवेल | प्रतिनिधी ।
तालुक्यातील कोपरा खाडीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्यात येत आहे.

एकाच वेळी सहा ते सात सक्षण पंपाद्वारे करण्यात येत असलेल्या रेती उपशामुळे, वाहतुकीसाठी आधीच धोकादायक झालेल्या शिव – पनवेल महामार्गवरील कोपरा पूल, तसेच हार्बर रेल्वे मार्गांवरील कोपरा रेल्वे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता असताना स्थानिक तहसील विभाग आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.