गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

| मुंबई | प्रतिनिधी |
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिरावल्याची माहिती समोर आल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्येच होत्या. मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा प्रकृती गंभीर झाल्या कारणाने व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

Exit mobile version