| मुंबई | वृत्तसंस्था |
काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिरावल्याची माहिती समोर आल्याने सर्व यांच्याच जीवात जीव आला होता. परंतु, आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समोर आले असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्येच आहेत. मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. परंतु, आता पुन्हा एकदा प्रकृती गंभीर झाल्या कारणाने व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.