। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांचा प्रथम स्मृतीदिन (तिथीनुसार) मंगळवारी (दि.18) सकाळी अलिबागमध्ये साजरा करण्यात आला. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात स्व. मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अशोक प्रधान, अॅड. विजय पेढवी, संजय पाटील, प्रफुल्ल पाटील, दिपक पाटील, नरेश गोंधळी, दत्ता ढवळे, नागेश्वर हेमाडे आदी मान्यवरांसह शेकापचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.