स्व. मोहन पाटील यांचे स्मृतिदिनाचे कार्यक्रम रद्द

। पेण । वार्ताहर ।
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री तथा पेण शेकाप कुटुंब प्रमुख, राज्यमंत्री स्व.भाई मोहनराव पाटील यांचा दि. 24 जुलै रोजी होणारा सातवा स्मृतिदिन करण्यात येणार नाही. शासनाच्या नियमांचे पालन करीत वाक्रुळ येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरी सर्व कुटुंबातील (शे.का.प. पेण,सुधागड) सदस्यांना विनंती आहे की, प्रत्येकाने आपल्या स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या दृष्टीने घरातच राहून भाईंच्या स्मृती जपायच्या आहेत. कुणीही वाक्रुळ येथे जायचे नाही, असे आवाहन शेतकरी कामगार पक्ष, पेणचे चिटणीस संजय डंगर यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version