27 एप्रिल रोजी होणार सन्मान
। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील संपादक यांना दिला जाणारा राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमतचे संपादक विनायक पाथ्रूडकर यांना तर जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, दिवंगत संतोष पवार यांच्या 27 एप्रिल रोजी नेरळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांचे उपस्थितीत होणार असल्याची माहिती कर्जत प्रेस क्लब कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नेरळ येथील कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या जेनी ट्युलिप सिबीएससी स्कुलच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. स्व संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती सुनील तटकरे असणार आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खा.सुनील तटकरे,कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ.महेंद्र थोरवे, कर्जतचे माजी आ.सुरेश लाड हे प्रमुख राहणार आहेत.
कर्जत प्रेस क्लब च्या माध्यमातून होत असलेल्या या पुरस्कार सोहळा बाबत अध्यक्ष राहुल देशमुख आणि सर्व पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून सदर पुरस्कार यांची घोषाल केली आहे.मुख्य कार्यक्रमाच्या आधी स्वरानुभूती वाद्यवृंद कडून देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.







