लातूर- श्रीवर्धन बसला ताम्हिणी घाटात अपघात

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
लातूरहुन श्रीवर्धनकडे येणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नसल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. लातूरहुन श्रीवर्धन कडे निघालेली बस ताम्हिणी घाटात आली असताना निसरड्या रस्त्यावरून घसरून रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला कलंडली. वाहक आणि चालकांने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

Exit mobile version