आनंदी अर्जुन ठाकूर शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील वशेणी या गावातील गरीब, गरजू व होतकरु मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात मिळावा म्हणून वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य कुमार आदिनाथ नरेश पाटील यांनी आनंदी अर्जुन ठाकूर ही शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत पाचवी, सातवी आणि दहावीमध्ये शिकणार्‍या गरीब, गरजू आणि होतकरु मुलांना प्रत्येकी एक हजार रूपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेचा फायदा उन्मेषा ठाकूर, प्रेम पाटील, सिद्धी म्हात्रे, यश पाटील, मुस्कान पाटील व आयुष्य ठाकूर या मुलांना मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले होते.

या कार्यक्रमात शिष्यवृत्ती सुरु करणारे आदिनाथ ठाकूर व आनंदी अर्जून ठाकूर यांना मंडळाकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास पंचायत सदस्य संदेश गावंड, कैलास पाटील, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, सतिश पाटील, डॉ. रविंद्र गावंड, आनंदी ठाकूर, अर्जून ठाकूर, बी. जे. म्हात्रे, जगन्नाथ म्हात्रे अनंत पाटील, नरेश पाटील, कुमार आदिनाथ पाटील, विजय पाटील, अनंत तांडेल, गणेश खोत, मिलींद पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version