बॉटल बँक उपक्रमाचा शुभारंभ

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।

पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसराचा संदेश देण्यासाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात प्लास्टिकच्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करण्यासाठी विशेष बॉटल बँक उभारण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या बॉटल बँकमध्ये नागरिकांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकाव्यात, त्या कचऱ्यात किंवा परिसरात फेकू नयेत, असा संदेश देण्यात येत आहे. ‘Feed me, not the Eart’ असा पर्यावरणपूरक संदेश या बॉटल बँकेवर देण्यात आला असून, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही होणार आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, इतर शासकीय कार्यालयांनीही अशा उपक्रमांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version