| अलिबाग | प्रतिनिधी |
आगरी समाज संस्था अलिबाग यांनी आधुनिकतेकडे वाटचाल सुरू ठेवत आता विवाह व्यवस्थेत नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. संस्थेच्या सर्वजातीय वधू-वर परिचय केंद्राला आता ऑनलाईन स्वरूप देण्यात आले असून, vivahamilan.in या पोर्टलचा शुभारंभ गुरुवारी (दि.2) अलिबागमधील हॉटेल गुरुप्रसाद हॉलमध्ये डॉ. जगन्नाथ पाटील व डॉ. दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सुजाता म्हात्रे, मंगेश म्हात्रे, रणजीत म्हात्रे, प्रविण घरत, ॲड. प्रसाद पाटील, प्रसाद पाटील, सुरेश पाटील, धनंजय म्हात्रे, अनंत म्हात्रे, राजेश पाटील, सतिश पाटील व विलास ठाकूर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







