एसटीच्या ई-शिवनेरी बससेवेचा प्रारंभ

| ठाणे | प्रतिनिधी |

एसटी महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रीक शिवनेरी बसचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर एसटीच्या शंभर नवीन अत्याधुनिक इलेक्ट्रीक शिवनेरी बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहेत. एसटीच्या ताफ्यात आठ ते दहा नव्या इलेक्ट्रीक शिवनेरी दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने एसटीचा संपूर्ण चेहरामोहराच बदलण्याचा संकल्प सोडला आहे. यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांना एसटीचे सदिच्छा दूत म्हणून जाहीर करण्यात आले. सध्या मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर 100 इलेक्ट्रिक शिवनेरी बसेस धावणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मेघा इंजिनिअरींग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक इलेक्ट्रीक बस या अत्याधुनिक असून त्यात मोबाईल चार्जिंग, आरामदायी आसनरचना आणि प्रवाशांच्या बॅगांसाठी खास कप्पे बनविण्यात आले आहेत.

Exit mobile version