। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने पहिल्या कर्जत कबड्डी लीग 2022 स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. तालुका मर्यादित ही स्पर्धा असून 12 संघांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. दोन दिवस चालणार्या या स्पर्धेला क्रीडा रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
तालुका कबड्डी असोसिएशनच्यावतीने पहिल्या कर्जत कबड्डी लीग 2022 स्पर्धेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात करण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जितेंद्र पाटील,प्रदीप ठाकरे, शरद लाड, विजय हांडे, मधुकर घारे, समीर एरूणकर, काशीनाथ शिंदे सागर भोईर, सुमित भोईर, शरद बडेकर, सतीश श्रीखंडे, वैभव जगताप, संतोष पाटील, प्रथमेश मोरे, राजू वाघरे आदी उपस्थित होते.
अर्जुन पुरस्कार सन्मानित शांताराम जाधव, भावसार, छत्रपती पुरस्कार सन्मानित गणेश शेट्टी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच शरद कदम यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. सलामीचा सामना रायगड वरीयर्स विरुद्ध लक्ष मेडिकल अँड वेदांत 501 वरीयर्स यांना मिळाला. पंचाची कामगिरी आंतरराष्ट्रीय पंच रवींद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली के. जी. म्हात्रे, पुरुषोत्तम पिंगळे, दशरथ पाटील, दिलीप वेखंडे, जयराम उघडे आदी सांभाळत आहेत.
कर्जत कबड्डी लीग 2022 स्पर्धेचा शुभारंभ
