। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी (दि.16) वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाश्रम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी आदींची तपासणी केली जाणार आहे.
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात 37 हजार 568 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला.
कुष्ठमुक्त सुरक्षित मोहिमेचा शुभारंभ
