| रेवदंडा | प्रतिनिधी |
ग्राहकांना ऑनलाईन डिजिटल सेवा पदार्पण करताना, रेवदंडा चंपावती पतसंस्थेने सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्यासाठी क्यूआर कोड सुविधा उपलब्ध केली आहे. या क्यूआर कोडचे लोकार्पण पतसंस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.
या कार्यक्रमास पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास जोशी, सचिव उल्हास तुरकर, संचालक अरविंद मनोहर, संचालक दिलीप पटेल, संचालक मोडक, संचालिका शामल पराड, संचालिका विना पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मानकर, व्यवस्थापिका शुभांगी घरत, मयुरेश फफे, बाळकृष्ण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, अध्यक्ष विश्वास जोशी यांच्यासह उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते पतसंस्थेचे सभासद निलेश माळी, संदीप तळकर, उपेंद्र कोटकर, प्रदीप म्हात्रे यांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. जनमानसात विश्वास ग्राहकांच्या मनात अधिक वाढवून, पारदर्शकता आणणार असे असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विश्वास जोशी यांनी म्हटले. या सेवेचा लाभ सभासदांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सलग चार वेळा अ ऑडिट वर्ग मिळविणारी ही पतसंस्था आहे.