जि.प.सदस्या चित्रा पाटील यांची उपस्थिती
। भाकरवड । वार्ताहर ।
भाकरवडमधील डायाची वाडी येथे येथिल ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा ताई यांच्या नेतृत्वाखाली नविन पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी पं.स. सदस्या रचना म्हात्रे , माजी सरपंच भूषण चवरकर भाकरवड गावचे अध्यक्ष शंकर पाटील, बाळाराम पाटील,राजेंद्र पाटील, सुधाकर पाटील, अमित पाटील ,लक्ष्मण पाटील,भारती पाटील,भगवान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भाकरवड ग्रामस्थ असलेल्या या डायाच्या वाडी येथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असत त्यांनी आपली व्यथा भूषण चवरकर यांच्या कडे मांडली लगेचच त्यांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा ताई पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर चित्रा पाटील यांनी या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.
भाकरवडमधील नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ
