। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध पोयनाड बाजारपेठेत असलेल्या जमाउदीन शहा बाबांचा हुरुस 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी माजी आ. पंडितशेठ पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या भावना पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य आस्वाद पाटील, सरपंच शकुंतला काकडे, माजी सरपंच भूषण चवरकर, दिलीप काकडे, गणेश शितकंजे, कैलास भोईर, महेंद्र पाटील, अजित चवरकर, विजेन्द्र तावडे,राजू जाधव,जनार्धन स्वामी, विद्याधर निळकर,अमरनाथ राऊत, वसंत शिंगासने,विजय पाटील,जीवन निळकर, महता आलम,अन्वर बुरानं, हैदर पठाण, मनोज चाचर, आयुफ औसेकर, नसरू औसेकर,मुराद बुरान, गफार औसेकर, विठ्ठल धुमाळ, दीपक पाटील, सुबोध पाटील, शैलेश गायकवाड, आदी मुस्लिम समाजाचे व हिंदू समाजाचे मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था,व जबाबदारी दर्गा समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील भाकरवड यांनी पहिली तर जवळपास पंचक्रोशीतील आठशेहुन अधिक भाविकांनी दर्शन, व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित मान्यवर यांचा स्वागत दर्गा कमिटी तर्फे सत्कार करण्यात आले.